न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ फेब्रुवारी २०१९) :- पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून अश्लील व्हिडीओ टाकणाऱ्या अकाऊंटधारकांवर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. त्यानुसार गुरुवारी ( दि. ६ ) बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी चार गुन्हें दाखल करण्यात आले आहेत. पिंपरी – चिंचवड शहरात एक महिन्यात नऊ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. गुरुवारी दाखल करण्यात आलेली पहिली घटना २९ एप्रिल २०१५ रोजी वाकड येथे घडली. महेश सहानी याने स्वत: च्या फेसबुक अकाउंटवरून लहान मुलांचे अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णा स्वामी यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.
दसरी घटना ५ मे २०१९ रोजी चिखली येथे घडली. बालाराम दास याने स्वत : च्या फेसबुक अकाउंटवरून लहान मुलांचे अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक बागुल यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.
तिसरी घटना ५ ऑगस्ट २०१५ रोजी दावडमळा, चाकण येथे घडली. किशोर भानुदास वाघमारे ( वय २४ , रा . दावडमळा , चाकण ) याने स्वतःच्या फेसबक अकाउंटवरून लहान मुलांचे अअश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम गायकवाड यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
चौथी घटना २४ एप्रिल २०१५ रोजी नाणेकरवाडी, चाकण येथे घडली. अजय माताप्रसाद सागर (वय २५. रा. चिखली) याने फेसबक अकाउंटवरून लहान मलांचे अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार राज किसन राठोड यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.