न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० फेब्रुवारी २०२०) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने संत रविदास महाराज यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस महापौर उषा ऊर्फ माई ढोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत झालेल्या या कार्यक्रमास अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, सहाय्यक आयुक्त आशादेवी दुरगुडे, अण्णा बोदडे, सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर कांबळे, बाबा कांबळे, गोरोबा गुजर, रमेश साळवे, दत्तात्रय शिंदे, पांडुरंग कांबळे, प्रल्हाद कांबळे, सविता सोनवणे, सुनिल रोकडे, सागर भोसले, संतोष वाघमारे, विनायक लोहकरे, अभिमान साबळे, दत्तात्रय सुर्यवंशी आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माहिती व जनसंपर्कचे प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.