न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० फेब्रुवारी २०२०) :- पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, दिवाणी व फौजदारी न्यायालय पिंपरी व पिंपरी चिंचवड अँडव्होकेट्स बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार (दि. ०८) रोजी पिंपरी येथील न्यायालयात तसेच आकुर्डी येथील पिं.चिं.म.न.पा.न्यायालयात लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते.
पिंपरी न्यायालयात १०५ खटले निकाली काढले तर तडजोड शुल्क व दंड स्वरूपात १,४६,०७,२८५ रुपयांची वसुली झाली. आकुर्डी मनपा न्यायालयात एकूण २४०० प्रकरणे निकाली काढण्यात आली तर दंड व विविध करांच्या स्वरूपात १२, ७८, ९५,३०६ रूपयांची वसुली झाली. सदर कार्यक्रमाचे उदघाटन पिंपरी न्यायालयातील मुख्य न्यायाधीश मे. ए.यु. सुपेकर साहेब व सह न्यायाधीश मे. एन. टी.भोसले साहेब, मे. डी.आर.पठाण साहेब व मे. आर एन मुजावर साहेब यांच्या उपस्थितीत तर आकुर्डी न्यायालयामध्ये मे. एस. बी. देसाई साहेब यांच्या उपस्थितीत पार पडले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मा. अध्यक्ष अँड. अनिलकुमार तेजवणी व प्रमुख पाहुणे मा. अध्यक्ष अँड. राजेश पुणेकर हे होते. पिंपरी चिंचवड अँडव्होकेटस बार असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष अँड. श्री. दिनकर बारणे, उपाध्यक्ष अँड.अतुल अडसरे, सचिव अँड. हर्षद नढे पाटील, महिला सचिव अँड. सुजाता बिडकर, सहसचिव अँड.पूनम राऊत,खजिनदार अँड.सागर अडागळे, ऑडीटर अँड.सुजाता कुलकर्णी व सदस्य अँड.राजेश रणपिसे, अँड. हरीश भोसुरे, अँड. विश्वेश्वर काळजे, तसेच मा. अध्यक्ष संजय दातीर पाटील, अँड. सुशील मंचरकर, अँड. सुहास पडवळ, अँड. किरण पवार, अँड. सुनील कडूसकर, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवा शिस्तपालन समितीचे मा. सदस्य अँड. आतिश लांडगे, ज्येष्ठ अँड. मारुती भापकर, अँड. देवराम ढाले, अँड. बी. के. कांबळे, अँड. गोरखनाथ झोल, अँड. गोरक्ष लोखंडे, अँड. योगेश थांबा, अँड. फ्रान्सिस भोसले, अँड. गोरख कुंभार, अँड. रामचंद्र बोराटे,अँड. नरेश शमनानी, अँड. संजय जाधव व इतर वकील वर्ग, पक्षकार तसेच एस.एन. बी. पी. लॉ कॉलेज, बालाजी लॉ कॉलेज व डी. वाय. पाटील लॉ कॉलेजचे प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमात बोलतांना न्यायालयातील न्यायाधीश मे. ए.यु. सुपेकर व मे. डी.आर पठाण साहेब व मे. आर एन मुजावर साहेब यांनी लोक न्यायालयात सहभागी होण्याचे महत्व सांगितले व बारचे अध्यक्ष अँड. दिनकर बारणे, कार्यक्रमाचे अध्यक्ष अँड. अनिलकुमार तेजवणी, प्रमुख पाहुणे अँड. राजेश पुणेकर यांनी जास्तित जास्त पक्षकारांनी लोकन्यायालयात सहभागी होवून खटले निकाली काढावेत, असे आवाहन केले.
या लोकन्यायालयात पॅनल परिक्षक म्हणून अँड. मेरी रणभिसे, अँड. सर्वेश निकम,अँड. दीपक इंगळे, अँड. कांता गोरडे, अँड. सोनल चांडक, अँड. सोनाली ओझा, अँड. संकल्पा वाघमारे, अँड. मोनिका गाढवे, अँड. राधा जाधव, अँड. आकाश दळवी यांनी काम पाहिले.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन सचिव अँड. सुजाता बीडकर यांनी केले तर, आभार अँड. पूनम राऊत यांनी मानले.