न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० फेब्रुवारी २०२०) :- महापालिकेतील सत्ताधारी भाजपचे गटनेते तथा सभागृह नेते एकनाथ पवार यांनी सभागृह नेते पदाचा आज राजीनामा दिला आहे. याबाबतची माहिती पवार यांनीच आज सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
फेब्रुवारी २०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजपची एकहाती सत्ता आली. भाजपची सत्ता येताच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे समर्थक आणि निष्ठावान असलेल्या एकनाथ पवार यांची सभागृह नेतेपदी नियुक्ती झाली होती. त्यांना तीन वर्षाचा कार्यकाळ मिळाला.
त्यांनी आज तडकाफडकी सभागृह नेतेपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली. पवार यांनी भाजपचे शहराध्यक्षपद भूषविले आहे. तीन वर्षात पक्षाने काम करण्याची संधी दिली मी समाधानी आहे. पुढील काळात पक्षाचे काम करणार आहे, असे पत्रकार परिषदेत एकनाथ पवार यांनी सांगितले.