न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ फेब्रुवारी २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरातील सर्व टपरी-पथारी-हातगाडी धारकांचे सर्वेक्षण करावे, अतिक्रमण कारवाई थांबवावी, पक्या गाळ्यात पुनर्वसन करावे. हॉकर्स झोन निर्माण करावे, नवीन व्यक्तीला लायसन देण्यात यावे यासह इतर विविध मागण्यांसाठी मंगळवार दिनांक (११) रोजी सकाळी ११.०० वाजता पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेवर मोर्चा काढण्यात आला टपरी-पथारी हातगाडी पंचायत अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांनी मोर्चाचे नेतृत्व केले.
यावेळी कार्याध्यक्ष बळीराम काकडे, सचिन प्रल्हाद कांबळे, शहर अध्यक्ष रमेश शिंदे, जिल्हाध्यक्ष मल्हार काळे, पुणे शहर अध्यक्ष राजू पोटे, अरुण भोसले, विलास थोरात, गणेश आहेर, यास्मिन शेख, पद्मिनी पंडित, रंजना धोडवल, राजमीन खान, काशीनाथ रसाळ, मोहन भिसे, अर्जुन सुरवशे, साद्धम खान, अभिमान साबळे, युनुस शेख आदी उपस्थित होते.
यबाबा कांबळे म्हणाले की, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने २००७ मध्ये टपरी-पथारी हातगाडीधारकांसाठी कायदा केला. यास पंधरा वर्ष होत आहेत. परंतु, अजून एकही हॉकर्स झोन शहरात झाले नाही. धोरण कागदावरच राहिले. या लहरी कारभाराविरोधात तिव्र आंदोलन करण्यात येईल, असा ईशारा यावेळी बाबा कांबळे यांनी दिला.