न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ फेब्रुवारी २०२०) :- “लोकशाहीच्या समृद्धीसाठी तरुणांचा सहभाग अतिशय महत्वाचा असुन लोकशाही आणि निवडणूकांचे महत्व समजुन सांगण्यासाठी तरुणांनी या मोहिमेचे लोक चळवळीत रुपांतर होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे” असे आवाहन माहिती व जनसंपर्क विभागाचे सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांनी केले.
राज्य निवडणूक आयोग व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने लोकशाही पंधरवडा दि.२६ जानेवारी २०२० ते १० फेब्रुवारी २०२० या कालावधीत आयोजित करण्यात आला होता. त्याअनुषंगाने दि. १० फेब्रुवारी २०२० रोजी मॉडर्न कॉलेज ऑफ फार्मसी, निगडी येथे वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली तेव्हा ते बोलत होते. लोकशाही, निवडणुका आणि सुशासन या विषयांवर बोलताना केंद्र निवडणूक आयोग व राज्य निवडणूक आयोग यांच्यातील फरक त्यांनी उपस्थितांना सांगितला.
या कार्यक्रमास माहिती व जनसंपर्क विभागाचे जनसंपर्क अधिकारी रमेश भोसले, स्पर्धेचे परिक्षक अॅड. वसंत कांबळे, अॅड. निशा गायकवाड, मॉडर्न कॉलेजचे एनएसएस प्रमुख प्राध्यापक डॉ. अमित तापकीर, प्राध्यापिका डॉ. अनुराधा मोरे व बहुसंख्येने विविध महाविद्यालयांचे स्पर्धक विद्यार्थी उपस्थित होते.
या स्पर्धेत पल्लवी थोरात, दिप्ती शिंदे, तृप्ती बेंद्रे, स्वीटी सोनवणे, मंगेश पुंडे, विजय गिरवाडे, श्यामबाला, ऋतुजा नायकवडी, सृष्टी गरड, चैत्राली गोरे, दिव्या हगवणे, आकाश गायकवाड, ऋतुजा गिरी, शार्दुल भांगे, अल्फीया मोमीन, ऋतुजा जोगदंड, आकाश केंद्रे, आशिष पाटील, जालिंदर भुतकर असे विविध महाविद्यालयातील स्पर्धक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांनी केले. स्पर्धेचे सुत्र संचालन मॉडर्न कॉलेजचे डॉ. अमित तापकीर यांनी केले तर आभार जनसंपर्क अधिकारी रमेश भोसले यांनी मानले.