न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ फेब्रुवारी २०२०) :- लोकशाही पंधरवडा निमित्त लोकशाही, निवडणुका आणि सुशासन या उपक्रमाचा प्रचार व प्रसार शहरातील विविध महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्याचे काम पिंपरी चिंचवड महानगरपालिका करीत आहे. हा उपक्रम लोकशाहीच्या समृद्धीसाठी अतिशय स्तुतीतुल्य आहे, असे मत बाबुरावजी घोलप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी व्यक्त केले.
राज्य निवडणूक आयोग व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने व बाबुरावजी घोलप महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने लोकशाही पंधरवडा दि. २६ जानेवारी २०२० ते १० फेब्रुवारी २०२० या कालावधीत आयोजित करण्यात आला होता. त्याअनुषंगाने बाबुरावजी घोलप महाविद्यालय, सांगवी येथे वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली तेव्हा ते बोलत होते.
या कार्यक्रमास माहिती व जनसंपर्क विभागाचे सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, जनसंपर्क अधिकारी रमेश भोसले, स्पर्धेचे परिक्षक अॅड. वसंत कांबळे, अॅड. निशा गायकवाड, बाबुरावजी घोलप महाविद्यालयाच्या प्राध्यापिका सुवर्णा खोडदे, डॉ. नंदा राशीनकर, सावित्री जाधव, प्राध्यापक ज्ञानेश्वर जांभूळकर, प्रकाश पंगारे व बहुसंख्येने विविध महाविद्यालयांचे स्पर्धक विद्यार्थी उपस्थित होते.
या स्पर्धेत रोहन देसाई, सुजीत काळंगे, योगेश अग्नीहोत्री, अजय गलाटे, मनोज शिर्के, अनिकेत कासारकर, राधिका कारके, रोहन कवडे, मनाली पाटील, सुदेश भालेराव, भागवत ताळीकोटे, रविंद्र जाधव, प्रिती पोवनकर, शुभम लेरुणकर, आनंद कांबळे, राधा ननावरे, विशाल कांबळे, तेजस पाटील, चैत्राली वीसपुते, नारायण यादव, भरत भोईर, राजेंद्र पराग, प्राजक्ता दबडे, अभिषेक आळंदकर, प्रितम कुलकर्णी, हर्षदा जाधव, वृशाली शिंदे असे विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा सहभाग होता.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांनी केले. स्पर्धेचे नियोजन व सुत्र संचालन बाबुरावजी घोलप महाविद्यालयाच्या प्राध्यापिका सुवर्णा खोडदे व प्राध्यापिका डॉ. नंदा राशीनकर यांनी केले तर आभार प्राध्यापिका सावित्री जाधव यांनी मानले.