न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ फेब्रुवारी २०२०) :- पिंपरी चिंचवड शहराला येत्या ४ मार्च रोजी ५० वर्षे पूर्ण होत आहे. यानिमित्त शहराच्या माहितीचा आठशे पानांचा ग्रंथ छापण्यात येणार आहे. त्यामध्ये शहराचा आजपर्यंतचा विकास, विविध प्रकल्प, शहराचे धार्मिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक वैभव, कला, क्रीडा क्षेत्रातील कामगिरी या ग्रंथामध्ये गुंफली जाणार आहे.
पिंपरी चिंचवड शहराची निर्मिती खेड्यापासून झाली आहे. पिंपरी चिंचवड महापालिका ही आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका मानली जाते. या शहराच्या स्थापनेला ४ मार्च रोजी पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त शहराचा सोनेरी प्रवास ग्रंथात मांडला जाणार आहे. अंशुल प्रकाशनच्या वतीने ही ग्रंथ निर्मिती करण्यात येणार आहे.