न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ फेब्रुवारी २०२०) :- चिंचवडमधील संत रविदास बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने बिजलीनगर परिसरातील शिवनगरीत रविवारी (दि. ९) रोजी संत रविदास महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी नगरसेवक नामदेव ढाके यांनी रविदास महाराजांच्या प्रतिमेस हार अर्पण करून दीप प्रज्वलन केले.
संत रविदास बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने जयंतीचे औचित्य साधत पिंपरी चिंचवड शहरातील गटई (चर्मकार) व्यावसायिकांना आवश्यक साहित्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी नगरसेवक नामदेव ढाके, साळवे सर, बळवंत बीडावर, परमेश्वर बनसोडे, सुरेखा सुर्वे, संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब सातपुते, प्रदीप तासगावकर, विजय शिंदे, शोभा सातपुते, स्वाती झरेकर, शरद झरेकर, गोविंद आमचेवाड, संत रविदास प्रतिष्ठान, चिखलीचे अध्यक्ष रामेश्वर पाचारणे, रखमाजी गोरे, दिलीप मोरे, शोभा मोरे, सविता सोनवणे, संतोष वाघमारे, सतीश रोकडे, महादेव कोळेकर व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी संत रविदास महाराजांच्या आठवणींना उजाळा दिला. महाराजांनी दिलेली सत्कर्माची शिकवण प्रत्येकाने आप-आपल्या वैयक्तीक आयुष्यात आमलात आणत, त्याप्रमाणे आचरण करावे, असे मत संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब सातपुते यांनी यावेळी व्यक्त केले.
बळवंत बीडावार यांनी सूत्रसंचालन केले तर, आभार बाळासाहेब सातपुते यांनी मानले.