न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ फेब्रुवारी २०२०) :- राष्ट्रीय हरित लवाद, पुणे यांच्या आदेशानुसार महापालिकेच्या अनिधकृत बांधकाम व अतिक्रमण विरोधी पथकाने पिंपळे गुरव (प्रभाग क्र. २९) मध्ये शनिवारी (दि. १५) रोजी नदीपात्रालगतच्या बांधकामांवर कारवाई केली.
पिंपळे गुरव येथील सृष्टी चौक परिसरातील नदीपात्रालगतचे १० पत्राशेड अंदाजे क्षेत्रफळ १२५००.०० चौ.फुट इतके बांधकाम संबंधित भोगवटादार यांनी स्वत:हून काढून घेतले व २० पत्राशेडवर अंदाजे क्षेत्रफळ २५०००.०० चौ.फुटाच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करणेत आली.
ही कारवाई कार्यकारी अभियंता बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग ड प्रभाग यांचे पथकाने केली. सदर कारवाई २ जेसीबी, १ डंपर, १ गॅस कटर तसेच १० मजुर, ६ मनपा अधिकारी व १० मनपा पोलीस कर्मचारी, यांच्या सहकार्याने करण्यात आली.











