न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ फेब्रुवारी २०२०) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने ‘ई’ क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत आज (दि. १५) रोजी प्रभाग क्र. ३ मध्ये डुडुळगाव येथे चालू असलेले अनाधिकृत पत्राशेडवर निष्कासनाची कारवाई केली.
या कारवाईमध्ये मौजे डुडुळगाव येथील १ पत्राशेड, एकुण क्षेत्रफळ अंदाजे २०००.०० चौ. फुट. बांधकाम पाडण्यात आले. सदर कारवाई अतिरिक्त आयुक्त -२ अजित पवार व सह-शहर अभियंता राजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अभियंता राजेंद्र राणे यांच्या अधिपत्याखाली महापालिका अतिक्रमण पथक, पोलिस पुरुष –०७ पोलिस महिला – ०५, जेसीबी – १, व मनपा कर्मचारी यांचे उपस्थितीत करण्यात आली, अशी माहिती बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग, कईफ क्षेत्रीय कार्यालयाचे कार्यकारी अभियंता तथा पदनिर्देशित अधिकारी यांनी दिली.











