न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० फेब्रुवारी २०२०) :- दिल्ली विधानसभा निवडणुका संपताच भाजपा सरकारने आत्तापर्यंतची सर्वात जास्त गॅसदरवाढ केली आहे. त्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेस पिंपरी चिंचवड शहरचे अध्यक्ष विशाल वाकडकर यांच्या नेतृत्वाखाली आज गुरुवारी आंदोलन करण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात झालेल्या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, महिला शहर अध्यक्ष वैशाली काळभोर, जेष्ठ नेते भाऊसाहेब भोईर, माजी विरोधी पक्षनेते मच्छीद्र तापकीर, शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष विजय लोखंडे, युवक राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस विशाल काळभोर, माजी नगरसेवक उत्तम हिरवे आणि आजी माजी नगरसेवक ,नगरसेविका, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.















