- पुणे जिल्हा औषध विक्रेता संघटनेचे उपाध्यक्ष विवेक तापकीर यांची मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० फेब्रुवारी २०२०) :- ऑनलाईन फार्मसीला कायद्याने बंदी असताना अनेक डॉक्टर किंवा नोंदणीकृत मेडिकल प्रैक्टिशनर ऑनलाईन औषधविक्रीसाठी सहकार्य करीत असून अशा बेकायदा विक्रीस पायबंद घातला जावा, अशी मागणी पुणे जिल्हा औषधविक्रेता संघटनेने इंडियन मेडिकल असोशिएशनकडे पत्राद्वारे केली आहे.
पुणे जिल्हा औषध विक्रेता संघटनेचे ( पुणे डिस्ट्रिक केमिस्ट असोशिएशन ) उपाध्यक्ष विवेक तापकीर यांनी इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संजय पाटील यांना पाठविलेल्या पात्रात म्हटले आहे की, आम्ही असे निदर्शनास आणून देतो की, आपल्याकडील बरेच नोंदणीकृत डॉक्टर्स हे ऑनलाईन औषध विक्रीस सहकार्य करीत आहेत. ऑनलाईन फार्मसी हे कॅसरसारखे असून लोकहिताच्या दृष्टीने खुप घातक आहे. आपण ऑनलाईन फार्मसीला सहकार्य केले तर, मोठ्या प्रमाणात झोपेच्या गोळ्या, गर्भपाताच्या गोळ्या, नशेच्या गोळ्या या सहजपणे विक्रीसाठी उपलब्ध होतील.
सदर ऑनलाईन औषध विक्री करणारे मेडीलाईफ नामक आपल्याकडील रजिस्टर्ड मेडिकल पॅक्टीशनर यांना प्रिस्क्रीप्शन पॅड त्यांची जाहिरात विविध प्रलोभन दाखवून त्यावर औषध प्रिस्काईब करून रूग्णास ऑनलाईन औषध खरेदी करण्यास प्रवृत्त करीत आहेत. ऑनलाईन औषध विक्री करणे कायद्याने अमान्य आहे. तेंव्हा, ऑनलाईन औषध विक्रीस आपणही कडाडून विरोध करून आपल्या संघटनेतर्फे शाश्वत पाठपुरावा करून ऑनलाईन औषध विक्री थांबविण्यास सहकार्य करावे, असे या पत्रात तापकीर यांनी म्हटले आहे.












