न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ फेब्रुवारी २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरातील १ जानेवारी २००० पूर्वीच्या झोपडपट्ट्यांचे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडून ( एसआरए ) मोफत पुनर्वसन करण्याचे नियोजन आहे. त्यामध्ये पहिल्या टप्प्यात आठ झोपडपट्ट्यांचे प्रस्ताव आले आहेत. सद्य : स्थितीत यशवंतनगर, शरदनगर आणि गणेशनगर ( पिंपरी ) या झोपडपट्ट्यांचे पुनर्वसनाचे काम हाती घेण्यात आले आहे. तर, त्यानंतरच्या २०११ पर्यंतच्या झोपडीधारकांचे सशुल्क पुनर्वसनाचे नियोजन आहे. सांगवीतील मुळानगर झोपडपट्टीचा २००२ मध्ये झालेल्या सर्वेक्षणात समावेश नसल्याने संबंधित झोपडपट्टीचे सशुल्क पुनर्वसन होण्याची शक्यता आहे. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या ( एसआरए ) नियमावलीस राज्य सरकारने नुकतीच मान्यता दिली.
या नियमावलीस मान्यता देताना अनेक महत्त्वपूर्ण तरतुदी करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये २०११ पर्यंतच्या झोपडीधारकांना पुनर्वसन योजनेचा लाभ घेता यावा, यासाठी सशुल्क पुनर्वसन करण्यास मान्यता दिली.
एसआरएकडे चिंचवड – इंदिरानगर , वाकड – काळाखडक , चिंचवड – विजयनगर , पिंपरी ( आंबेडकरनगर ) , भोसरी गवळीमाथा , पिंपरी वाघेरे – गणेशनगर , वाकड – सव्हे क्रमांक २१० / ३ , २१० / ४ , साईबाबा ( चिंचवड ) , सव्र्हे क्रमांक २०० / १ आदी झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन प्रस्ताव दाखल आहेत . सध्या पहिल्या टप्प्यात यशवंतनगर – नेहरूनगर , शरदनगर – निगडी , गणेशनगर ( पिंपरी ) या झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनाचे काम ‘ एसआरए मार्फत हाती घेण्यात आले आहे . यशवंतनगर आणि शरदनगर झोपडपट्टी पुनर्वसनासाठी लाभार्थ्यांची यादी तयारी झाली आहे . शरदनगर झोपडपट्टीची जागा रिकामी करण्यात आली आहे . लवकरच बांधकाम सरू करण्यात येणार आहे . गणेशनगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पासाठी देखील आवश्यक कामांना सुरवात झाली आहे . चिंचवड – विजयनगर , पिंपरी ( आंबेडकरनगर ) , एम . बी . कॅम्प ( किवळे ) या झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन काही कारणांमुळे रखडले आहे . म्हातोबानगर झोपडपट्टी ( वाकड ) , लालटोपीनगर ( मोरवाडी ) या झोपडपट्ट्यांचे देखील ‘ एसआरए ‘ मार्फत पुनर्वसन करण्याचे नियोजन असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली . सांगवीतील मुळानगर झोपडपट्टीचा २००२ मध्ये झालेल्या सर्वेक्षणात समावेश नाही . त्यामुळे ही झोपडपट्टी २००० नंतरची गृहीत धरून तिचे सशुल्क पुनर्वसन होण्याची शक्यता आहे.
एसआरएच्या वतीने शहरातील १ जानेवारी २००० पर्यंतच्या झोपड्यांचे मोफत पुनर्वसन केले जाईल. तर, १ जानेवारी २००० नंतर ३१ डिसेंबर २०१० पर्यंतच्या झोपड्यांचे सशुल्क पुनर्वसन होणार आहे. सध्या ‘ एसआरए ‘ कडून यशवंतनगर, शरदनगर आणि गणेशनगर ( पिंपरी ) या झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनाचे काम सुरू करण्यात आले आहे.
– वैशाली उंटवाल – इदनानी, उपजिल्हाधिकारी मनपा, एसआरए