न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ फेब्रुवारी २०२०) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत असलेल्या त्यांच्या प्रतिमेस महापौर उषा ऊर्फ माई ढोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी उपमहापौर तुषार हिंगे, अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, श्री राष्ट्रसंत गाडगेबाबा सेवाभावी संस्थेचे प्रशांत दळवी, किरण लोंढे, सुनिल अभंग, संतोष भालेकर, विश्वनाथ दळवी, निलेश पवार, वैशाली राऊत आदी उपस्थित होते.












