न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ फेब्रुवारी २०२०) :- स्थायी समिती सभापती विलास मडेगिरी यांच्यासह आठ सदस्यांचा कार्यकाळ येत्या २९ फेब्रुवारीला संपणार आहे. सदस्यांचा कार्यकाळ संपण्यापुर्वी नवीन सदस्यांची नियुक्ती करणे आवश्यक आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आज बुधवारी (दि. २६) रोजी झालेल्या सभेत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीसाठी भाजपचे नगरसेवक शशिकांत कदम, अंबरनाथ कांबळे, संतोष कांबळे, अभिषेक बारणे, सुवर्ण बुर्डे व भीमाबाई फुगे या सहा जणांची तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुलक्षणा धर, पौर्णिमा सोनवणे यांची वर्णी लागली आहे. पक्षनेत्यांनी बंद पाकीटातून नावे दिली. महापौर उषा ढोरे सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या.















