न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ फेब्रुवारी २०२०) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेचे सफाई कामगार शक्ती बोहत याच्यावर गुन्हे दाखल होऊन त्याला पोलिसांनी तडीपार केले आहे. सफाई कामगार सुनील कांबळे हे तब्बल १ हजार ४६९ दिवस विनापरवानगी गैरहजर होते. या दोघांना सेवेतून काढून टाकण्याची कारवाई आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी नुकतीच केली आहे.
सफाई कामगार बोहत त्याच्यावर ३२६, ५०४, ३४ नुसार गुन्हे दाखल आहे. त्यांना १६ मार्च २०१७ ला सेवानिलंबित केले आहे. त्याला पोलिसांनी ५ नोव्हेंबर २०१८ ला तडीपार केले आहे.
खातेनिहाय चौकशी रद्द करून त्याला कामावरून काढून टाकण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे. तर, सफाई कामगार कांबळे हे जानेवारी २०२० अखेर एकूण १ हजार ४६९ दिवस विनापरवानगी गैरहजर आहे. कारणे दाखवा नोटिशीला त्यांनी उत्तर दिलेले नाही. त्यामुळे त्यांना कामावरून काढण्याचा आदेश आयुक्तांनी दिला आहे.















