न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ फेब्रुवारी २०२०) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी किरण गायकवाड यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल होता. त्यांना सेवेतून निलंबित करण्यात आले होते. ते गुन्ह्यातून निर्दोष मुक्त झाले आहेत. त्यामुळे त्या पदावर त्यांची पुन्हा नियुक्ती करण्यास आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी नुकतीच मंजुरी दिली.
आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा गायकवाड यांच्यावर संगमनेर पोलिस ठाण्यात १८ जुलै २०१३ ला दाखल झाला होता. या प्रकरणी पालिकेने त्याची खातेनिहाय चौकशी सुरू करून त्यांचे निलंबन केले होते. गायकवाड हे गुन्ह्यातून निर्दोष मुक्त झाले आहेत.
त्यामळे आढावा समितीने गायकवाड यांचे निलंबन रद्द करून त्यांना पुन्हा सेवेत घेण्याची शिफारस केली होती. त्यामुळे त्यांचे सेवानिलंबन रद्द करून सेवेत घेण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला. निलंबन कालावधी हा विनावेतन करण्यात येणार आहे.












