न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ फेब्रुवारी २०२०) :- संभाजी ब्रिगेडच्या पिंपरी चिंचवड शहर पुनर्गठन कार्यक्रमाच्या बैठकीचे आयोजन (दि . १ मार्च) रोजी सकाळी १० ते १२ वाजण्याच्या दरम्यान आकुर्डी येथे करण्यात आल्याची माहिती शहर अध्यक्ष प्रविण कदम यांनी दिली.
या बैठकीस केंद्रीय उपाध्यक्ष डॉ . संदीप तांबारे , पुणे विभागीय अध्यक्ष किरणराज घाडगे, संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष अभिमन्यू पवार व मुंबई प्रांताचे सुहास राणे, आण्णासाहेब सावंत उपस्थित राहणार आहेत.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी संतोष गाजरे असणार आहेत. संभाजी ब्रिगड संघटनेच्या वाढीसाठी योग्य नेतृत्वाची गरज आहे, ती पूर्ण व्हावी व शहरामध्ये ब्रिगेडचे काम अधिक जोमाने व्हावे, या उद्देशाने या बैठकीचे आयोजन केले असल्याचे कदम यांनी सांगितले. या बैठकीत संघटनेच्या पिंपरी – चिंचवड शहर – जिल्हा अध्यक्षाची निवड केली जाणार आहे. त्या अनुषंगाने मुलाखती घेण्यात येणार आहेत.















