न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ फेब्रुवारी २०२०) :- ११ ते १३ मार्च या दरम्यान वेतवाढ आणि इतर मागण्यांसाठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. मात्र सरकारशी याबाबत सकारात्मक चर्चा झाली. ज्यामुळे हा संप स्थगित करण्यात आल्याची माहिती ऑल इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशनने केली आहे.
यामुळे ग्राहकांची गैरसोय टळणार आहे. मुंबईत बँक कर्मचाऱ्यांच्या नऊ संघटनांचे प्रतिनिधी आणि इंडियन बँक असोसिएशनचे प्रमुख राजकिरण राय यांच्यात चर्चा झाली. कर्मचाऱ्यांच्या काही मागण्यांना बँक असोसिएशनने सकारात्मक प्रतिसाद दिला. ज्यामुळए ११ मार्चपासून पुकारण्यात आलेला संप स्थगित करण्यात आला. इंडियन बँक असोसिएशनचे महासचिव सी. एच. वेंकटचेलम यांनी ही माहिती दिली.












