न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ फेब्रुवारी २०२०) :- पुण्यातील डेक्कन जिमखाना यथे २९ फेब्रुवारी रोजी पुणे जिल्हा अंतर कचेरी शुटींग व्हाॅलीबॉल स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिका संघाने अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथम क्रमांक पटकाविला. तसेच इटऑन इंडिया कंपनीने द्वितीय क्रमांक पटकाविला.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका संघाकडून कर्णधार दशरथ वाघोले व सोमनाथ विर, सुहास नाईक, विजय गांगुर्डे यांनी उत्कृष्ट खेळी केली व ०७-२१ अशा मोठ्या फरकाने पिंपरी-चिंचवड महानगरपालिका संघाने सलग पाचव्या वर्षी विजय प्राप्त केला.
याबद्दल या संघाचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी अभिनंदन केले. यावेळी संघातील कर्णधार दशरथ वाघोले व सोमनाथ विर, सुहास नाईक, विजय गांगुर्डे, प्रशांत उबाळे, अंकुश लोहकरे, अरुण जागडे, तुकाराम गायकवाड, जानकर सुरेश, विटकरे वैभव, भोसले सीताराम, साळवी शिवाजी, क्रीडा अधिकारी रज्जाक पानसरे उपस्थित होते.












