न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ फेब्रुवारी २०२०) :- पिंपरी चिंचवड मनपाचे माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्या कार्यालयावर दि. ७ जून २०१९ रोजी हल्ला झाला होता. याचा तपास पोलीसांनी योग्य दिशेने केला नाही, असा आरोप पोलिसांवर करीत माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने हे त्यांच्या कुटूंबियांसह आज सोमवारी (दि. २ मार्च) पासून आमरण उपोषण करणार होते.
तत्पुर्वी आज सोमवारी सकाळी अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी दत्ता साने यांच्याशी संवाद साधला व या विषयाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील पोलीस आयुक्त यांना पत्र दिले आहे, असे सांगितले.
या गुन्हाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिखली पोलीस ठाणे हे करतील, असेही त्यांनी सांगितले. त्यानंतर दत्ता साने यांनी आपले उपोषण स्थगित केले आहे, अशी माहिती दत्ता साने यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.












