न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ मार्च २०२०) :- जागतिक महिला दिनानिमित्त मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महिलांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमास जिओ फाउंडेशन, उद्योजिका अध्यक्ष प्रीती काळे, समाजप्रबोधनकार शारदा मुंडे, मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, तांदळे महाराज. अण्णा जोगदंड, ज्येष्ठ नागरिक संघाचे श्रीकृष्ण खडसे, दत्तात्रय धोंडगे वामन भरगंडे, बळीराम माळी, शंकर तांबे व कार्यकर्ते उपस्थित होते. सुजाता निकाळजे, अलका जोशी, शारदा मुंडे, प्रीती काळे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ‘ जिद्द महिला गौरव ‘ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
त्यात वैद्यकीय क्षेत्रासाठी डॉ. किरण माकन, डॉ. अपूर्वा माकन, डॉ. ऊर्मिला झिंझुरणे, सामाजिक क्षेत्रासाठी सुजाता निकाळजे, आशा साबळे, उद्योजिका क्षेत्रासाठी प्रीती काळे, माधवी बाईत यांचा सन्मान करण्यात आला. दत्तात्रय धोंडगे यांनी सूत्रसंचालन केले.















