न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ मार्च २०२०) :- पिपरी चिंचवड महानगरपालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने ‘ ह ‘ क्षेत्रिय कार्यालया अंतर्गत प्रभाग क्र. ३० कासारवाडीमध्ये गुरुवारी (दि. ०५) रोजी अनधिकृत पत्राशेडवर कारवाई केली.
कासारवाडी येथील १० अनधिकृत पत्राशेडवर ( अंदाजे ७९८ चौ . मी. ) ही कारवाई करण्यात आली. सदर कारवाई कार्यकारी अभियंता सतीश इंगळे यांचे मार्गदर्शनाखाली उपअभियंता सुधीर मोरे व शेखर गुरव व इतर कनिष्ठ अभियंता, बीट निरिक्षक यांचे पथकाने केली. या कारवाईसाठी १० मनपा पोलीस तसेच १ जे . सी . बी, १ ट्रक व ०७ मजूर यांचे सहकार्य घेण्यात आले.













