न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ मार्च २०२०) :- पिंपरी चिंचवड महापालिका स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी आज (दि. ६) रोजी निवडणूक पार पडली. अध्यक्षपदासाठी सत्ताधारी भाजपच्या संतोष लोंढे यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून पंकज भालेकर हे निवडणुकीच्या रिंगणात होते.
परंतू, राष्ट्रवादीने शेवटच्या क्षणी पंकज भालेकर यांचा उमेदवारी अर्ज मागे घेत ही निवडणूक बिनविरोध केली आहे. स्थायी समितीच्या अध्यक्षपदी संतोष लोंढे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी स्थायी समिती अध्यक्षपदाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार आज स्थायी समिती सभागृहात दुपारी १२ वाजता अध्यक्षपदासाठी निवडणूक पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी कामकाज पाहिले.













