न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिरीक्त आयुक्तपदी राज्य शासनाने नांदेड जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची नियुक्त केली आहे. आज सोमवार (दि. २९) रोजी त्यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला आहे
अतिरिक्त आयुक्त अच्युत हांगे यांची बदली झाल्यानंतर अतिरिक्त आयुक्त पदाचा अतिरिक्त भार सहायक आयुक्त प्रवीण अष्टीकर यांच्याकडे दिला होता. त्यापदावर नियुक्ती होण्यासाठी अष्टीकर यांनीही जोरदार प्रयत्न सुरु ठेवले होते. मात्र, राज्य शासनाने अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यामध्ये नादेडचे अतिरिक्त जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची नियुक्ती पिंपरी चिंचवडच्या अतिरिक्त आयुक्तपदी करण्यात आली आहे.
आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी त्यांचे स्वागत केले आहे. संतोष पाटील यांची प्रथम विदर्भात यवतमाळ येथे उपजिल्हाधिकारी पदावर नियुक्ती झाली होती. त्यानंतर मराठवाड्यात ही त्यांनी विविध पदावर काम केले आहे. ते मुळचे सोलापुर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील आहेत.










