- करोनाची लक्षण आढळल्यास त्वरित रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावेत – दिनेश यादव…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० मार्च २०२०) :- संपूर्ण जगभरामध्ये कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. कोरोना व्हायरस आपल्या शहरात पसरू नये व रुग्णांची संख्या मर्यादित रहावी, याकरीता कुदळवाडीतील आमदार श्री पै महेशदादा लांडगे युवा मंच च्या वतीने पुढाकार घेण्यात आला. नुकतेच कुदळवाडी संघाच्या वतीने कुदळवाडीत ‘मोफत मास्क’ चे वाटप करण्यात आले.
यावेळी ‘ फ ‘ प्रभागाचे स्वीकृत नगरसदस्य दिनेश यादव, काका शेळके, किशोर लोंढे, स्वप्निल पोटघन, सुरेश वाळुंज, प्रसाद मायभट्टे, विशाल उपाम, कासम नदाफ आदी कार्यकर्ते व परिसरातील नागरिक उपस्थित होते.
दिनेश यादव यावेळी म्हणाले की, करोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील शाळा, महाविद्यालयासह सर्व दुकाने तसेच कंपन्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. शहरातील बाजारपेठा बंद आहे. कोरोनाचा मुकाबला करण्यात डॉक्टरांसह सामाजिक कार्यकर्त्यांचीही भूमिका महत्वाची आहे. बाजारात मास्कचा तुटवडा आहे. गोरगरीब नागरिकांना मास्क मिळत नाहीत. त्यामुळे आमदार महेशदादा लांडगे युवा मंचचा अध्यक्ष या नात्याने कुदळवाडी परिसरातील नागरिकांसाठी मोफत मास्कचे वाटप करण्यात आले. नागरिकांनी गर्दी टाळावी. तसेच करोनाची लक्षण आढळल्यास त्वरित रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावेत, असे आवाहन यावेळी यादव यांनी केले.















