न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० मार्च २०२०) :- करोनामुळे राज्य सरकारनं लॉक डाऊनच्या दिशेनं पावलं टाकण्याचा निर्णय घेतला. गेल्या आठवड्यात तसा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला होता.
जीवनावश्यक वस्तूंशिवाय अन्य दुकानं बंद करण्याचं आवाहन केलं होतं. त्याला प्रतिसाद उत्तम आहे. काही ठिकाणी ऑफिस सुरू आहेत. परंतु आता मुंबई महानगर परिसरात, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूरमध्ये जीवनावश्यक सेवा सोडून सर्व बंद ठेवणार आहोत. ही बंदी ३१ मार्च पर्यंत असणार असून आज मध्यरात्रीपासून हे आदेश लागू होणार आहेत,” असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. मुख्यमंत्र्यांनी आज राज्यातील जनतेशी संवाद साधला.
खासगी क्षेत्रातील सर्व कंपन्या बंद ठेवण्याचा निर्णय आज घेतल्याची माहिती मुख्मयंत्र्यांनी दिली. हातावर पोट चालणाऱ्यांना किमान वेतन द्यावं. कंपन्यांच्या मालकांनी माणुसकी जपावी, असंही आवाहन त्यांनी केलं. असं केल्यानं गर्दी कमी होईल अशी अपेक्षा आहे. ही फिरण्याची सुट्टी नाही. गर्दी कमी न झाल्याचं वाटल्यास नाईलाजानं रेल्वे, बससेवा बंद करावी लागेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.















