न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ मार्च २०२०) पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कोरोना साथीसंदर्भात आज (मंगळवारी) रात्री आठ वाजता पुन्हा एकदा राष्ट्राला संबोधित करणार आहेत. मागील संबोधनात त्यांनी जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते.
देशात कोरोनाबाधितांचा आकडा ५०० पेक्षा अधिक झालेला असताना पंतप्रधान कोणती नवीन घोषणा करणार,याबाबत उत्सुकता व्यक्त करण्यात येत आहे. कोरोनाच्या लढाईची पुढील दिशा काय असेल, हे पंतप्रधान आज सांगतील, असा अंदाज जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत आहे. कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची गरज लागणार असून त्यासाठी देखील पंतप्रधान देशातील दानशूरांना आवाहन करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.















