न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ मार्च २०२०) :- सारी ( सिव्हिअर अॅक्युट रेस्पिरेटरी इन्फेक्शन्स ) या आजाराने औरंगाबाद शहरातील एकाचा मंगळवारी मृत्यू झाला. सारी व कोरोनाची लक्षणे सारखीच आहेत. सारीचे आणखी दोन रुग्ण दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
औरंगाबादमधील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल ‘ सारी ‘ ग्रस्त रुग्ण दगावल्याची माहिती महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नीता पडळकर यांनी दिली. सारी या आजारातह कोरोनाप्रमाणेच सर्दी, खोकला ताप ही लक्षणे आढळतात.
सारी आणि कोरोनामध्ये फरक एवढाच आहे की, सारीच्या रुग्णाल एकदम सर्दी, ताप येतो. तापाचे प्रमाण जास्त असते. अशक्तपणा खूप येतो रुग्णालयात दाखल केल्यावर व्हेंटिलेटरवर ठेवण्याशिवार पर्याय उरत नाही. हा आजार इतका भयानक आहे की दोन-तीन दिवसांतच रुग्णाचे निधन होउ शकते, असेही डॉ. नीता पडळकर यांनी सांगितले.













