- महापालिका व नगरसेवकांनी ही योजना प्रभागात राबविण्यासाठी पुढाकार घ्यावा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ मार्च २०२०) :- कोरोना विषाणूचे संक्रमण टाळण्यासाठी सर्वत्र प्रयत्न होत आहेत. विविध शहरे यासाठी वेगवेगळ्या शक्कल लढवताना दिसत आहेत. तळेगाव दाभाडे येथील नगरपरिषदेने गर्दी होऊ नये आणि नागरिकांमध्ये सुरक्षित अंतर राहावे यासाठी नवीन सकल्पना राबवली आहे.
तळेगाव दाभाडे परिसरात १६ भाजी आणि फळांच्या दुकानांसमोर प्रत्येकी पाच चौकोन करण्य आहेत. त्यात चौकोनात प्रत्येकी एक प्रमाणे दुकानाबाहेर केवळ पाच नागरिकांना उभे राहण्यास परवानगी आहे. या चौकोनांमध्ये अंतर आले आहे. तळेगावात अशा एकूण १६ अत्यावश्यक दुकानाबाहेर ही उपाययोजना करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांमध्ये सुरक्षित अंतर राखले जाणार असून अनावश्यक गर्दीही टाळली जाणार आहे.













