न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ मार्च २०२०) :- आज पिंपरी चिंचवड शहरातील वातावरणात बदल झाला असून, आकाशात ढग दाटून आले आहेत. त्यातच विजांचा कडकडाट होऊन शहराच्या काही भागात अवकाळी पाउस जोरदार हजेरी लावणार असे दिसते. दरम्यान, काल शहरात मध्यरात्रीनंतर काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी बसल्या होत्या.
आज दुपारनंतर सर्वत्रच थंडगार हवा पसरली आहे. पुणे वेधशाळेने कालच राज्यात पाच-सहा दिवस पाऊस होण्याची शक्यता वर्तवली होती. पुणे जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रात आज आणि उद्या पावसाच्या हलक्या सरी कोळण्याचा अंदाज व्यक्त केला होता.












