न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ मार्च २०२०) :- महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची संख्या १२४ वर पोहचली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली. नवी मुंबई आणि ठाण्यात प्रत्येकी एक रुग्ण आढळल्याने करोनाग्रस्तांची संख्या १२४ वर पोहचली आहे.
बुधवारपर्यंतही रुग्णसंख्या १२२ होती. आता दोन नवे रुग्ण आढळल्याने ही संख्या १२४ वर गेली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे.
करोनाचा फैलाव थांबवण्यासाठी राज्य सरकारने महाराष्ट्रात संचारबंदी लागू केली आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ एप्रिलपर्यंत देशात लॉकडाउन जाहीर केला आहे. या कालावधीत कुणीही आत्यंतिक गरज असल्याशिवाय घराबाहेर पडू नये असं आवाहन करण्यात आलं आहे. जीवनावश्यक वस्तू, आरोग्यसेवा, अत्यावश्यक सेवा या सगळ्या संचारबंदी आणि लॉकडाउनमधून वगळण्यात आल्या आहेत. दरम्यान आत्तापर्यंत १५ जणांना डिस्चार्ज देण्यात आल्याचीही माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करुन दिली आहे.













