न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ मार्च २०२०) :- लाॅकडाऊनमध्ये कसे सुरक्षित रहायचे आणि आपले जीवनपद्धती कशी सोपी करायची याबद्दल मुख्यमंत्री कार्यालयाकडून माहिती देण्यात आली आहे.
- ग्राहकांनी दुकानाबाहेर योग्य अंतर राखून रांगेत उभे राहावे.
- आवश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी केवळ एकाच व्यक्तीने घराबाहेर पडावे.
- घराबाहेर पडताना मास्क वापरावा.
- खरेदी करताना व पैसे देताना दुकानदारापासून योग्य अंतर राखावे.
- घराबाहेर असताना अनावश्यक वस्तूंना हात लावणे टाळावे.
- पोलिसांनी थांबविल्यास तुमचे घराबाहेर पडण्याचे कारण स्पष्ट करा.
- गर्दी व संसर्ग टाळण्यासाठी दुकानदारांनी व्हाट्सअपवर ऑर्डर घेऊन ग्राहकांना डिलिव्हरीची वेळ द्यावी.
- अत्यावश्यक सेवांसाठी बाहेर असलेल्यांनी आपले ओळखपत्र सतत जवळ ठेवावे.
- ड्रायव्हर, नोकर इ. यांना पगारी रजा द्या. कामावर येताना त्यांना संसर्ग झाला तर तो तुम्हालाही होऊ शकतो.
- डिलिव्हरीसाठी येणाऱ्या व्यक्तींपासून सुरक्षित अंतर राखा.
- घरी आल्यावर प्रथम आपले हात साबण व पाण्याने धुवा.
- खरेदीसाठी एक वेगळी पिशवी राखून ठेवा.
- संसर्गाची शक्यता कमी करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक टाळा.
- संसर्गाची चिन्हे दिसल्यास प्रथम स्वतःला सर्वांपासून वेगळे करा आणि हेल्पलाइनवर फोन करा.
या काही सोप्या सवयींमुळे तुम्ही स्वत:ला आणि तुमच्या कुटुंबाला सुरक्षित ठेवू शकता.













