न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १ मे २०२६) :- शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग वाढविण्याच्या उद्देशाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे ‘घरोघरी महापौर’ अभियान राबविण्यात येत आहे. “तुमचा अभिप्राय – आपल्या शहराच्या विकासाचा पाया!” या संकल्पनेवर आधारित या उपक्रमाद्वारे नागरिकांचा आवाज थेट महापौर Ravi Landge यांच्यापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न आहे.
या अभियानांतर्गत केवळ पाच सोप्या प्रश्नांद्वारे नागरिकांचे मत नोंदवले जाणार असून पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते व आरोग्य सेवा याबाबत अभिप्राय घेतला जात आहे. बचत गटांच्या महिला ‘सिद्धी’ ॲपच्या माध्यमातून घराघरांत जाऊन माहिती संकलित करत आहेत.
नागरिकांकडून मिळणारा अभिप्राय शहर नियोजन व सेवा सुधारण्यासाठी महत्त्वाचा ठरणार असून प्रशासन अधिक पारदर्शक व लोकाभिमुख होण्यास मदत होणार आहे.













