न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ एप्रिल २०२०) :- देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डमध्ये करोना वायरस covid-19 च्या उपाय योजनेसंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. त्यामध्ये आत्तापर्यंत केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला व यापुढे बोर्डाच्या वतीने काय काय उपाय योजना व काळजी घेण्यात येणार आहे, याचे नियोजन करण्यात आले. याप्रसंगी उपाध्यक्ष रघुविर उध्दवराव शेलार, मुख्य कार्यकारी अधिकारी रामस्वरूप हरितवाल, नगरसेवक राहुल बालघरे, विशाल खंडेलवाल, हाजीमलंग मारीमत्तु, अमोल नाईकनवरे, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अधिकारी उपस्थित होते.
संपूर्ण देहूरोड शहरामध्ये आत्तापर्यंत औषध फवारणी करण्यात आली असून यापुढे देखील सात हॅन्डपंप व एक कॉम्प्रेसर मशीन च्या साह्याने दर आठवड्याला संपूर्ण भाग फवारणी करण्यात येणार आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या माध्यमातून दररोज साफसफाई, घंटागाडी, पिण्याचे पाण्याची व्यवस्था सुरळीत चालू आहे व राहील. देहूरोड भाजी मंडई एका ठिकाणी असल्यामुळे त्या ठिकाणी होणारी गर्दी नियंत्रण करता येत नसल्यामुळे त्याठिकाणी (सोशल डिस्टन्ससिंग) सुरक्षित अंतर ठेवण्यास शक्य होत नाही. त्यामुळे करोना विषाणू संसर्ग होण्याची शक्यता बघता एका ठिकाणचे भाजी मंडई बंद करून त्याऐवजी वेगवेगळ्या भागामध्ये भाजीपाला विक्रेत्यांनी भाजी विक्री करावी ती पुढीलप्रमाणे :-
पंडित नेहरू मंगल कार्यालयासमोर, थॉमस कॉलनी शितळा नगर भागात, सिद्धिविनायक नगरी दत्तनगर, चिंचोली भैरवनाथ मंदिरासमोर, एम बी कॅम्प ग्राउंड, श्री छत्रपती शिव शंभू चौक सेंट्रल रेस्टॉरंट जवळ, शेलारवाडी गावात शिवाजी चौक, गांधीनगर डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड. या व्यतिरिक्त आवश्यकता भासल्यास सातही नगरसेवक कार्यकर्त्यांना, स्वयंसेवकांना बरोबर घेऊन आपल्या आपल्या प्रभागात ट्रॅक्टर किंवा पिकप च्या साह्याने आपापल्या प्रभागात घरपोच भाजीपाला देण्याचे देखील सोय करणार आहेत. तसेच किरण दुकानदार या ठिकाणीदेखील होणारी गर्दी पाहता त्यांनादेखील सेफ्टी किट ठेवणे बंधनकारक करण्यात येणार आहे व आपापल्या दुकानासमोर (सोशल डिस्टन्ससिंग) सुरक्षित अंतर ठेवणे पाळण्यासाठी व्यवस्था करण्याचे सूचना देणार आहेत.
तसेच आपल्या भागात दिल्ली किंवा इतर शहरातून नव्याने कोणी व्यक्ती आले असल्यास त्याची माहिती बोर्डाला द्यावी अशी नागरिकांना व स्थानिक कार्यकर्त्यांना देखील विनंती करण्यात आले आहे जेणेकरून त्यांची योग्य ती वैद्यकीय तपासणी करणे व त्यांना आवश्यक ती काळजी घेण्यास सांगता येईल. तसेच देहूरोड कॅन्टोमेंट बोर्ड हद्दीमध्ये ज्या कुटुंबातील कोणीच व्यक्ती कामाला नसेल किंवा व्यावसायिक नसेल व ज्यांना रोजच्या रोज काम केल्यानंतरच दोन वेळचे जेवण उपलब्ध होते अशा कुटुंबीयांना किंवा संचारबंदी, लोक डॉन मुळे आपल्या शहरात अडकून पडलेल्या व्यक्तींना विद्यार्थी कामगार यांना पंधरा दिवसाचा किराणा देन्या साठी कॅन्टोमेंट बोर्ड नगरसेवक व कर्मचारी यांच्या माध्यमातून सर्वे करून ते देखील घरपोच वाटप करणार आहे. यासाठी उपाध्यक्ष रघुवीर शेलार यांनी स्वतःचे एक महिन्याचे मानधन कॅन्टोन्मेंट बोर्डाला देऊ केले आहे. देहूरोड शहरातील व्यापाऱ्यांनी व ज्यांना इच्छा आहे अशा नागरिकांनी देखील यामध्ये आपली मदत कॅन्टोन्मेंट बोर्डाला द्यावी असे देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या वतीने उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी विनंती केली.
तसेच आवश्यकता पडल्यास देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हॉस्पिटलमध्ये देखील करोना पॉझिटिव्ह रुग्णांचे उपचार करण्यासाठी चार बेडची व्यवस्था करण्यात आले आहे व केंद्र सरकार, राज्य सरकार, पुणे जिल्हा अधिकारी यांच्याकडून आलेल्या सर्व सूचनांचे देखील योग्य ते पालन केले जात आहे. देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड करोना वायरस प्रादुर्भाव रोखण्यासाठी योग्य ती कारवाई करत आहे. परंतु नागरिकांनी देखील संपूर्ण लॉक डाऊन पाळून सहकार्य करणे आवश्यक आहे असे उपाध्यक्ष यांनी आवाहन केले. तसेच संपूर्ण शहरात कोणालाही कुठलीही अडचण असल्यास आपण उपाध्यक्ष रघुवीर शेलार यांना 73 9000 9000 या मो. नंबर वरती कॉल किंवा एसएमएस करू शकता, अशी माहिती देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष रघुविर शेलार यांनी दिली आहे.













![[ब्रेकिंग न्यूज] लाचखोरीच्या आरोपानंतर मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे निलंबित!...](https://newspcmc.com/wp-content/uploads/2026/11/Screenshot_20261104_200149_Google-190x122.jpg)




