न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २ एप्रिल २०२०) :- डी मार्ट ‘ च्या पार्किंगमधून दुचाकी चोरीची दुसरी घटना काळेवाडी येथे मंगळवारी दि. ३१) दुपारी एक ते दोन वाजताच्या दरम्यान घडली. राकेश दीनदयाळ अग्रवाल (वय ४२, रा. साई कॉलनी, काटे वस्ती, रहाटणी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अग्रवाल यांची ३५ हजार रुपये किंमतीची एमएच – १४ – ईजे – ५७८६ ही दुचाकी काळेवाडी येथील डी मार्टच्या पार्किंगमध्ये मंगळवारी दुपारी एक वाजता पार्क केली. एक तासाने ते जीवनावश्यक वस्तू खरेदी करून पन्हा पार्किंगमध्ये आले असता त्यांना आपली दुचाकी चोरीस गेल्याचे दिसुन आले. महिला पोलीस उपनिरीक्षक सपना देवतळे याबाबत अधिक तपास करीत आहेत.













![[ब्रेकिंग न्यूज] लाचखोरीच्या आरोपानंतर मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे निलंबित!...](https://newspcmc.com/wp-content/uploads/2026/11/Screenshot_20261104_200149_Google-190x122.jpg)




