न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २ एप्रिल २०२०) :- कोरोनामुळे पिंपरी – चिंचवड महापालिकेची सर्वसाधारण सभा तहकूब झाल्याने सन २०२० – २१ च्या अर्थसंकल्पास ३१ मार्चपर्यंत मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सादर केलेला अर्थसंकल्प बुधवार (दि. १) पासून लागू झाला आहे. त्यानुसार पालिका प्रशासनाने कामकाज सुरू केले आहे.
महापालिका आयुक्त हर्डीकर यांनी स्थायी समितीकडे केंद्र शासनाच्या निधीचा समावेश असलेला एकूण ६ हजार ६२७ कोटी ९९ लाख रूपयांचा अर्थसंकल्प १७ फेब्रुवारीला सादर केला होता. स्थायी समितीने तब्बल ७०० कोटी रूपयांच्या उपसूचना देऊन तो अंतिम मंजुरीसाठी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेकडे फेब्रुवारीला पाठविला.
या दरम्यान देशात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढला. त्याला रोखण्यासाठी राज्य शासनाने जमावबंदी व संचारबंदी लागू केली. त्यामुळे पालिकेची २० मार्चची सभा तहकूब झाली. ३१ मार्चपूर्वी अर्थसंकल्पास महापालिका सभेची मंजुरी न मिळाल्याने आयुक्तांनी सादर केलेला अर्थसंकल्प दि. १ एप्रिलपासून लागू झाला आहे. प्रशासनाने त्यानुसार कामकाज सुरू केले आहे.













![[ब्रेकिंग न्यूज] लाचखोरीच्या आरोपानंतर मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे निलंबित!...](https://newspcmc.com/wp-content/uploads/2026/11/Screenshot_20261104_200149_Google-190x122.jpg)




