- देशाच्या पंतप्रधानांनी संकटाचाही इव्हेंट करायचं ठरवलं – जितेंद्र आव्हाड…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३ एप्रिल २०२०) :- कोरोच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर लोकांना दिलासा देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाला संबोधित केलं. यावेळी त्यांनी देशवासीयांकडे ९ मिनिटांचा वेळ मागितला आणि ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता आपल्या घराबाहेर दिवा पेटवण्याचं आवाहन केलं. मात्र याच मुद्द्यावरून आता राष्ट्रवादीचे नेते आणि कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड पंतप्रधान मोदींवर संतापले आहेत.
‘भारताने कोरोनाविरुद्धची लस शोधली, एकालाही मास्क कमी पडू देणार नाही. डॉक्टरांच्या मागे आम्ही उभे आहोत. कुठलाही गरीब उपाशी झोपणार नाही. असे भाषण मोदींकडून अपेक्षित होते. तर त्यांनी या संकटाचाही इव्हेंट करायचं ठरवलं. म्हणे… अंधार करा आणि बॅटरी पेटवा. देशाला इतकेही मुर्खात काढू नका,’ अशा शब्दांत जितेंद्र आव्हाड यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.












