न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३ एप्रिल २०२०) :- नवी सांगवी विवेकानंदनगर येथे १० मार्च रोजी दुखी थापा याने दारू पिऊन परिसरातील एका महिलेची छेड काढली. यामुळे संतापलेल्या परिसरातील युवकांनी त्याला चांगलाच चोप दिला.
त्यानंतर ज्या बंगल्यावर तो सुरक्षारक्षकाचे काम करत होता, तेथील मालकाने ही त्यास बांबूने मारहाण केली. या मारहाणीत जखमी झालेल्या दुखी थापा याला मुंबईला नेले. १८ मार्च रोजी तळोजा येथील नातेवाईकांना भेटण्यासाठी दुखी थापा हा गेला असता त्यास दोन तीन अनोळखी व्यक्तींनी बांबूने मारहाण केली असल्याची खोटी माहिती त्याच्या नातेवाईकांनी भोईवाडा, मुंबई येथील पोलिसांना दिली.
१९ मार्च रोजी मुंब्रा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्रकृती खालावली. यामुळे त्याला मुंबईतील केईएम रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान २१ मार्च रोजी त्याचा मृत्यू झाला. दुःखी नवलसिंग थापा असे खून झालेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी महेंद्र गंजे थापा (वय २२, रा. अमृतनगर, मुंब्रा कौसा, जिल्हा ठाणे) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.












