न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३ एप्रिल २०२०) :- एका व्यक्तीने दिल्ली येथील निजामुद्दीन मरकज प्रकरणाबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट केली. त्या पोस्टवर आरोपीने आक्षेपार्ह कॉमेंट लिहिली.
या कॉमेंटमुळे मुस्लिम समाजातील लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या. याबाबत पोलिसांनी पुढाकार घेऊन गुन्हा दाखल केला आहे. भोसरी पोलिसांनी गुरुवारी (दि. २ ) गुन्ह्याची नोंद केली आहे. संजय शेंडगे (रा. कासारवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस नाईक विनायक वर्पे यांनी फिर्याद दिली आहे.भोसरी पोलीस तपास करीत आहेत.












