न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३ एप्रिल २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरातील लोकं लॉकडाऊन असतानादेखील घराबाहेर फिरत आहेत. लोकांना अजुनदेखील कोरोना आजाराचं गांभीर्य समजलेले दिसत नाही. त्यांना पोलीसांचीही भीती राहीली नाही. ही लोकं इतरांनी केलेल्या आवाहनाला देखील प्रतिसाद देत नाहीत.
शहरातील काळेवाडी, रहाटणी परिसरात देखील अशीच परिस्थती आहे. कॉलनी व अंतर्गत रस्त्यावर पुरुष, महिला, तरूण मुलं बिंधास्त फिरताना दिसत आहेत. पोलीस दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे निभावत आहेत. मात्र. पोलिसांची ही नाकाबंदी शहरातील प्रमुख महामार्ग, वर्दळीचे चौक व नाक्यावरच आहे. त्यामुळे पोलीसं अंतर्गत भागात येउच शकत नाहीत, अशी धारणा या आगंतुक लोकांची झालेली दिसते.
त्यामुळे पोलिसांनी महत्वाच्या चौकाबरोबरच अतर्गत रस्ते, कॉलनी व झोपडपट्टीतील परिसरात देखील गस्त सुरु करावी. अन्यथा असेच चालु राहीले तर, मुंबईसारखी अवस्था पिंपरी चिंचवड शहराची होण्यास वेळ लागणार नाही, अशी भीती शहरातील जाणकार व सुजाण नागरिक व्यक्त करीत आहेत.













