- करोनाग्रस्तांची भारतातील संख्या २९०२ तर, राज्यात ५३७ वर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ एप्रिल २०२०) :- देशातील करोनाग्रस्तांचा आकडा दिवसोंदिवस वाढताना दिसत आहे. करोनाग्रस्तांची भारतातील संख्या दोन हजार ९०२ झाली आहे. शनिवारी सरकारने दिलेल्या आकडेवारीनुसार करोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या ६८ वर पोहचली आहेत.
देशामध्ये करोनाचा फैलाव वाढू लागल्याने रुग्ण शोधमोहीम तीव्र करण्यात आली आहे. करोनाची बाधा झाल्याची शहानिशा करण्यासाठी मागील २४ तासांमध्ये देशात आठ हजार वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. एका दिवसात झालेल्या या सर्वाधिक चाचण्या आहेत.
आज महाराष्ट्रात ४७ नवे रूग्ण, त्यातील ४३ मुंबई-ठाण्यात आढळले आहेत. यापैकी २८ मुंबईतील, १५ ठाण्यातील, दोन पुण्यातील, तर अमरावती व पिंपरी चिंचवडमधील प्रत्येकी एक आहे. शुक्रवारी रात्रीपर्यंत ही संख्या ४९० होती. आता ही संख्या ५३७ झाली आहे.













