न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ एप्रिल २०२०) :- सध्या लोकउपयोगी कार्यालये, पोलीस ठाणे, हॉस्पिटल्स व वृत्तपत्रे कार्यालये यामध्ये नागरिकांची ये जा म्हणजेच वर्दळ ही वाढत चाललेली आहे. कोरोनाबाबत असलेला असवंदेशीलपणा आणि काहीसा निष्काळजीपणा मात्र या काळात तिथे कार्यरत असणारे कर्मचारी यांना नकळत सोसावा लागू शकतो. हे सत्य नाकारता येऊ शकत नाही. या विभागात काम करणाऱ्या अनेकांना या विषाणूचे संक्रमण झालेले आढळून आले आहे. अनेक बाधित सध्या रुग्णालयात दाखल झाले आहेत.
सध्या ह्या प्रमुख विभागात व संस्थांमध्ये काम करीत असणारे सर्व कर्मचारी हे “फ्रंट वॉरिअर्स ” म्हणजेच पहिल्या फळीतील सैनिक आहेत. त्यांनी या कोरोना विरोधाच्या युद्धात स्वतःची सुरक्षा व खबरदारी बाळगणे जास्त गरजेचे आहे. कोविड -१९ या आजाराचे गांभीर्य ओळखून प्रत्येक लोकउपयोगी कार्यालये, हॉस्पिटल्स व पोलीस ठाण्यांनी तसेच शासकीय संस्थानी सुरक्षितता बाळगणे अत्यावशक आहे.
सर्व कर्मचाऱ्यांनी काही महत्वाच्या पुढील गोष्टीचे पालन करावे :-
१. कोणत्याही कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर दोन पेक्षा जास्त नागरिक सहज प्रवेश करू शकणार नाही अश्या पद्धतीने नियोजन करावे. म्हणजेच महाद्वाराचे रूपांतर नॅनोद्वारावर करावे.
२. सोशल डिस्टन्स चे पालन करण्यासाठी यलो व ब्लु रेबिन चा वापर वर्किंग टेबल जवळ करावा म्हणजेच वर्किंग टेबलपासून पाच फुटाच्या अंतरावर येणाऱ्या सर्व व्यक्तीनां रोखुन कामकाज पार पाडता येईल.व संसर्गही रोखता येईल.
३. स्टील फर्निचर, काच, व कार्यालयीन वस्तू ज्या जास्त वेळा किंवा सतत हाताळल्या जातात त्याचे नियमितपणे निर्जंतुकीकरण होणे,साफ सफाई होणे महत्वाचे त्यासाठी डेटॉल युक्त पाणी वापरले तरी चालू शकेल.
५. दर तासाला ‘२० सेकंद’ हात स्वच्छ धुवा, ‘हँड वॉश बेल’ दर तासाने वाजेल अशी सर्व कार्यालयांनी उपाययोजना करावी.
६ शेक हॅन्ड करणे पूर्णपणे थांबवा.
७. हाताचा स्पर्श चेहऱ्याला होणार नाही याची काळजी घ्या, या करिता वेळोवेळी सॅनीटायझर्सचा वापर करा.
८. मोकळ्या वातावरणात व सूर्यप्रकाशात म्हणजेच योग्य व्हँटिलेशन असणाऱ्या ठिकाणी कामकाज करण्याची व्यवस्था करा,सर्व खिडक्या खुल्या असाव्या.
९. जो पर्यंत कोरोना विषाणूचा धोका टळत नाही तोपर्यत एकत्रित भोजन पद्धत बंद करा.
१०. जर एखाद्या सहकाऱ्यास आजाराची सुरुवातीची लक्षणे आढळल्यास त्वरित वरीष्ठ अधिकाऱयांना या संदर्भात सूचित करा.
११. सार्वजनिक पिण्याचे पाणी व्यवस्था अतिशय स्वच्छ निर्जंतुकीकरण असणाऱ्या ठिकाणीच असावी.अश्या ठिकाणावरून विषाणू पसरण्याची शक्यता असल्याने वॉटर बॅग ची सवय करा.
१२. वैद्यकीय क्षेत्राशी निगडित असणाऱ्या सर्व विभागीय कार्यलयांनी भारत सरकार स्वास्थ विभागाने पारित केलेल्या सूचना व गाईडलाईन्स ह्या प्रामाणिकपणे व काटेकोरपणे आमलात आणाव्यात.
१३. हॅन्डग्लोज, मास्क किंवा सुती कापडाचा वापर करने अनिवार्य करा.
१४. सोशल डिस्टन्स चे पालन करून कर्मचाऱयांनी दररोज १५ मिनिटे सकाळच्या वेळेस दीर्घ श्वसन, कपालभाती,भस्त्रिका,भ्रामरी या श्वसन व्यवस्थेशी निगडित प्राणायाम करावा.
“फ्रंट वॉरिअर्सची आपल्या विकसनशील देशात कमतरता आहे. त्यामुळे हे शासकीय कर्मचारी तसेच संलग्न संस्थांचे कर्मचारी हे या युद्धजन्य आपत्कालीन परस्थितीमध्ये अतिशय मोलाचे कार्य करीत आहेत त्याचे जीवन सुद्धा अमूल्य आहे. कोरोना विषाणू विरोधात सध्या तरी कोणतीच लस उपलब्ध नसल्याने खबरदारी, सुरक्षितता व दक्षता बाळगणे हीच एकमेव उपाययोजना आहे”, अशी माहिती प्राधिकरण नागरी सुरक्षा समितीचे विजय पाटील यांनी दिली आहे.