न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ एप्रिल २०२०) :- मीच माझा रक्षक, मी घरात थांबणार आणि करोनाला हरवणार हा मंत्र प्रत्येकाने पाळला. स्वयंशिस्त राखली तर कदाचित १४ एप्रिलनंतर काही भागांमध्ये लॉकडाउन शिथील होऊ शकतं असे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत.
फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून राजेश टोपे यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा स्वयंशिस्त पाळा. मी घरात थांबणार मी करोनाला हरवणार हा मंत्र दिला आहे.
महाराष्ट्रात एकूण ५३७ पॉझिटिव्ह करोनाग्रस्त आहेत. मात्र ५० जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. लॉकडाउन आणि संचारबंदीच्या माध्यमातून आपण काळजी घेत आहोत. ट्रेसिंग करणं हे आता आव्हान आहे. सध्याच्या घडीला ९ लाख लोकांचं ट्रेसिंग केलं आहे. २ हजार ४५५ टीम्स तयार केल्या आहेत. प्रतिबंधित क्षेत्रात त्या टीम करत आहेत. २९० विभाग मुंबई प्रतिबंधित करण्यात आले आहेत. या विभागातही लोक काम करत आहेत. नागपूर, पुण्यातही काम करत आहेत. त्यांना सहकार्य करा असं राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.













