न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ एप्रिल २०२०) :- अमित भालेराव हा ‘अमित भालेराव मित्र परिवार’ या ग्रुपचा अॅडमीन आहे. तर आरोपी सुशीलकुमार हा त्या ग्रुपचा सदस्य आहे. आरोपी सुशीलकुमार याने ‘अमित भालेराव मित्र परिवार’ या व्हाट्स अप ग्रुपवर विशिष्ट धर्माच्या नागरिकांकडून काही साहित्य खरेदी करू नका. त्यांना आपल्या गल्लीमध्ये येऊ देऊ नका, अशी समाजामध्ये द्वेषभावना पसरविणारी माहिती टाकली. ही घटना शुक्रवारी (दि. ३) रात्री आठ वाजताच्या सुमारास निगडी येथे घडली.
सुशीलकुमार सिमरूराम खैरालिया (वय ५४) आणि अमित मनोज भालेराव (वय ३३, दोघेही रा. ओटास्कीम, निगडी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस कर्मचारी विकास निलचंद दुधे यांनी शनिवारी (दि. ४) निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
या पोस्टला अॅडमीन हा देखील जबाबदारी असल्याने पोलिसांनी ग्रुप अॅडमीन आणि सदस्य या दोघांवरही भारतीय दंड विधान कलम १५३ (अ) (ब) नुसार गुन्हा दाखल केला आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.













