न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ एप्रिल २०२०) :- आमदार पै महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ फ ‘ प्रभागाचे स्वीकृत नगरसेवक दिनेश यादव व पिंपरी चिंचवड महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने आज सोमवारी (दि. ६) रोजी कुदळवाडीत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
हे शिबीर कुदळवाडीतील विठ्ठल मंदिराजवळ, यादवनगर परिसरात संपन्न झाले. यावेळी करोना आजाराच्या पार्श्वभूमीवर परिसरातील महिला, पुरुष, जेष्ठ नागरिक, लहान मुले यांची सर्दी, ताप, खोकला व इतर आजारांवरील आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी सर्वाना आवश्यक ती औषधे, गोळ्या मोफत देण्यात आल्या.
आरोग्य शिबीर यशस्वीतेसाठी डॉक्टरांसह महापालिकेची आरोग्य टीम, आमदार पै महेशदादा लांडगे युवामंचाचे पदाधिकारी काक शेळके, सुरेश वाळुंज, किशोर लोंढे, आदींनी परिश्रम घेतले, अशी माहिती ‘ फ ‘ प्रभागाचे स्वीकृत नगरसेवक दिनेश यादव यांनी दिली.













