न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ एप्रिल २०२०) :- देशभरातील करोनाबाधितांची संख्या ४०६७ वर पोहोचली असून १०९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २४१ रुग्ण बरे झाले आहेत अशी माहिती आरोग्य मंत्रालायने दिली आहे. गेल्या २४ तासांत ६९३ नवे रुग्ण आढळले आहेत. ११४५ रुग्ण तबलिगी मरजकशी संबंधित आहेत अशी माहिती यावेळी देण्यात आली.
पुणे शहरात काल रात्री उशिरा आणि सकाळच्या सत्रात एनआयव्हीकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार १० जण कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. हे रुग्ण कोंढवा, मोमीनपूरा आणि गुरुवार पेठ भागातील आहेत, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.













