न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ एप्रिल २०२०) :- कोरोना विषाणूमुळे संपूर्ण देशात-राज्यात लोकडाऊन झाले आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरात कामानिमित्त आलेल्या व अडकून पडलेल्या नागरिकांना दोन वेळचे जेवण मिळणे मुश्किल झाले आहे. या पार्श्वभूमीवर चिंचवड-प्राधिकरण येथील अग्रवाल समाजाच्या ‘नेशन हेल्प ग्रुप’ ने पुढाकार घेत, ‘अन्नदान हेच महादान’ या उक्तीप्रमाणे ‘श्री अग्रसेन अन्नपूर्णा रसोई’ च्या माध्यमातून शहरातील जवळपास पाच हजार लोकांना दोन वेळच्या जेवणाची सोय केली आहे. त्यात शहरातील पोलीस बांधव, विद्यार्थी व परप्रांतीय कामगार आदींचा समावेश आहे. याशिवाय शहरातील प्रत्येक भागात जेथे आवश्यकता आहे, त्या ठिकाणी महापालिकेच्या माध्यमातून गोर-गरिबांना जेवणाचे वाटप केले जात आहे.
या कामी आमदार आण्णा बनसोडे, महेश लांडगे, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, नगरसेवक शीतल शिंदे, शैलेश मोरे, शर्मिला बाबर, राजू मिसाळ, अनुप मोरे यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
याशिवाय अग्रवाल समाज ‘नेशन हेल्प ग्रुप’ चे सुनील जयकुमार अग्रवाल, उद्योजक अमन अग्रवाल, प्रेमचंद मित्तल, विनोद बंसल, रमेश गोयल, मुकेश मित्तल, जोगिंदर मित्तल, विनोद मित्तल, सुशील मित्तल, सुजित गर्ग, संदीप गुप्ता, सतपाल मित्तल, नविन बंसल, सुरेंद्र बंसल, आशिष अग्रवाल, अशोक तायल, एस. के गुप्ता, कमलराज अग्रवाल, लाजपत मित्तल, नितीन अग्रवाल व अग्रवाल समाजातील सदस्यांनी व नेशन हेल्प ग्रुपच्या कार्यसंघाने विशेष परिश्रम घेतले.
यापुढे शहरात कोणतीही समस्या उद्भवल्यास व संकट आल्यास अग्रवाल समाजाची नेशन हेल्प ही संस्था व अग्रवाल समाज नेहमी शहरवासीयांच्या मदतीसाठी तत्पर असेल. शहरातील नागरिकांनी देखील घराबाहेर न पडता शासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन अग्रवाल समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.













