- भारतीय जनता पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त केले अन्नधान्याचे वाटप…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ एप्रिल २०२०) :- कोरोना विषाणू प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सरकारने दक्षता म्हणून संपूर्ण देशात लॉकडाउन केल्यामुळे अनेक गरजू कुटुंबाना अन्नधान्य व जेवणाची अडचण होत आहे. या संकट काळी माणुसकीचा हात म्हणून नगरसेवक रघुवीर शेलार स्नेह ग्रुप व देहूरोड शहर भाजपच्या वतीने गहू किंवा आटा, तांदूळ, बाजरी, साखर, पोहे, तेल, मीठ, तूरडाळ, मसूर, बेसन पीठ, हरभरा, चहा पावडर, मसाला, हळद, साबण असे अन्नधान्य व इतर वस्तूंसह ५० किट देहूरोड कॅन्टोमेंट बोर्ड चे मुख्य कार्यकारी अधिकारी रामस्वरूप हरितवाल यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले आहेत व अजून ५० किट देणार आहोत.
यावेळी भाजपचे मावळ तालुका अध्यक्ष रवींद्र भेगडे, भाजपचे देहूरोड शहराचे अध्यक्ष बाळासाहेब शेलार,अमरदेवी नागरी पत संस्थेचे संस्थापक संचालक गजानन शंकरराव शेलार, पुणे जिल्हा भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष विलासभाऊ शिंदे, देहूरोड शहर भाजपचे माजी अध्यक्ष उध्दावराव शेलार, देहूरोड शहर भाजपा उत्तर भारतीय आधाडीचे अध्यक्ष दिनेश सिंह, उद्योजक अमित यादव, लहू न. शेलार, रामहरी न. शेलार, उद्योजक मयुर शेलार, बजरंग दल देहूरोड उपखंड सहप्रमुख सचिन शेलार, उद्योजक मयुर शेलार, अक्षय शेलार, अमोल शेलार, दिनेश शेलार, संदीप शेलार, अभिजीत शेलार, पुष्कर शेलार इत्यादी पदाधिकारी व नगरसेवक रघुवीर शेलार स्नेह ग्रुपचे कार्यकर्ते उपस्थित होते.
मुख्य कार्यकारी अधिकारी हरितवाल साहेब म्हणाले नगरसेवक रघुवीर शेलार स्नेह ग्रुप व भाजपा देहूरोडच्या पदाधिकारी यांचा आदर्श घेऊन देहूरोड मधील सर्वच राजकीय संघटना, सामाजिक संस्था, व्यापारी असोसिएशनचे उद्योजक व शहरातील प्रमुख मान्यवर व इच्छुक नागरीकांनी सर्वांनी देहूरोड कॅन्टोमेंट बोर्डला वस्तू किंवा रोख स्वरूपात मदत करायला हवी.












